मनसूख हिरेन प्रकरणात आणखी दोन पोलीस अधिकारी 'एनआयए'च्या रडारवर - दोन पोलीस अधिकारी एएनआयच्या रडारवर
मनसुख हिरेन प्रकरणात दोन पोलीस निरीक्षक एनआयएच्या रडारवर आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात यांचा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे.
मुंबई - मनसुख हिरेन प्रकरणात दोन पोलीस निरीक्षक एनआयएच्या रडारवर आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात यांचा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पीआय दर्जाच्या अधिकाऱ्याने चार मार्च रोजी वाजेच्या गाडीला स्कॉट केलं होतं. गायमुख चौपाटी ते ठाणे खाडी दरम्यान हे स्कॉट केलं होतं कारण जर या मार्गावर कोणती नाका-बंदी असेल तर अडचण नको आणि या प्रकरणात वाचू शकू. एनआयएला असा संशय आहे की, जेव्हा हा अधिकारी वाझेंना स्कॉट करत होता तेव्हा वाझेच्या गाडीत मनसुख हिरेन होते. त्याचवेळी हिरेन यांचा मृतदेह फेकण्यासाठी जात होते, असा संशय एनआयएला आहे.
एनआयएला एक अशी माहिती मिळाली आहे की, एक दुसरा पीआय दर्जाचा अधिकारी. सीआययुच्या कार्यालयात होता. तेव्हा वाझे यांचा मोबाईलही कार्यालयात होता. त्या पीआयला सांगितलं होतं की, फोन आला तर वाझे बिझी आहेत असे सांगणे. मात्र तेव्हा वाजेला एकही फोन आला नव्हता. एनआयएने त्या दिवशीचा सीडीआर काढला. मात्र यात फक्त वाझेंना आठ जाहिरातीचे मेसेज आले होते.