मुंबई - एनआयएकडून एका पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्हे शाखेशी संबंधीत असणाऱ्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची एनआयएकडून चौकशी केली असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ३ हजार ७५८ नागरिकांना कोरोनाची लागण
याआधीही एका पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. सचिन वाझे याच्या कार्यालयात 3 मार्चला मनसुख हिरेन, विनायक शिंदे आणि गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याची बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान हे पोलीस उपायुक्त योगायोगाने तिथे पोहोचले होते. त्यामुळे याचसंदर्भात ही चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हत्या प्रकरणाशी सबंध नसला तरी काही फॅक्टस पडताळण्यासाठी एनआयएकडून या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते असे सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा -आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस