मुंबई - एनआयएकडून काल केलेल्या छापेमारीमध्ये 15 लोकांना नोटीस ( NIA Summoned 15 People ) देऊन आज चौकशीला बोलवले आहे. एनआयएने काल एकूण 29 ठिकाणी छापे टाकले ( NIA Raids In Mumbai ) होते. कारवाई दरम्यान लॅपटॉप, मोबाईल फोन, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे, मोठी रक्कम आणि अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. एनआयएने काल एकूण 15 हून अधिक लोकांची चौकशी केली आणि त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. एनआयएने अनेकांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
एनआयएची 15 जणांना नोटीस - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित व्यक्तींविरोधात आज एनआयएने मुंबईत 24 तर मीरा भाईंदर परिसरामध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली होती. या प्रकरणात एनआयएने 15 लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आले आहे. आज या सर्वांची टेन या कार्यालयात चौकशी होणार आहे.
यांची मुख्य चौकशी - दाऊद इब्राहिम संबंधातील सर्व प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयए लास्ट पोल यानंतर या प्रकरणात यावर्षी 3 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम साथीदार छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि नातेवाईक यांचा समावेश आहे.
सहा जणांना घेतले ताब्यात - सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये सहा जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांची चौकशी केल्यानंतर या सर्वांना सोडून देण्यात आले. पुन्हा आज काही आवश्यक कागदपत्रासह या सहा जणांसह इतर 9 लोकांना देखील आज एनआयए कार्यालयात चौकशी करिता बोलवले आहे. त्यामध्ये छोटा शकील चे नातेवाईक सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी, चित्रपट निर्माता समीर हिंगोरा, अब्हुल कयूम याच्यासह आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रकरणाशी संबंधित चौकशी NIA कडून सुरू आहे.
कागदपत्रासह शस्त्रास्त्र केली जप्त - एनआयएने ज्या प्रकरणात छापेमारी केली ते हाजी अनीस म्हणजे अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथिदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आलीय. तसेच दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही एनआयएने दिली आहे.