माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सोहेल खंडवानीच्या घरी आणि ऑफिसमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. NIA कडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधितावर छापेमारी करण्यात आली आहे.
Mumbai NIA Raids Live Update : एनआयएची मुंबईत छापेमारी, छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटला NIA ने घेतले ताब्यात
12:31 May 09
सोहेल खंडवानीच्या घरी आणि ऑफिसमध्ये छापेमारी
12:22 May 09
छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट याला NIA ने घेतले ताब्यात
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हस्तक असलेला छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट याला NIA ने ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या पथकाने ग्रँट रोड परिसरातून सलीम शेख उर्फ सलीम फ्रुट याला ताब्यात घेतले. सलीम शेख हा दाऊद इब्राहिमचा हस्तक असून त्याची ईडीने दोनदा चौकशी केली होती. एनआयएने छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत अशी माहिती मिळत आहे.
12:17 May 09
NIA Raids Live Update : अंडरवर्ल्डसाठी काम करणाऱ्यांवर मोठी कारवाई
मुंबई -कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ( Dawood Ibrahim ) याच्याशी संबंधित मुंबईतील जवळपास 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA Raids in Mumbai ) छापे टाकले आहेत. यामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (NIA Raids in Mumbai) सलिम फ्रूट असे ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. ( NIA raids locations linked to Dawood Ibrahim ) दरम्यान, माहिममध्येही चार ठिकाणी छापा टाकला आहे.
एनआयएने मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून अंडरवर्ल्डसाठी काम करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम कासकरचा जवळचा असलेला सलीम फ्रूट हा दक्षिण मुंबईतील तळांवर कार्यरत आहे. फेब्रुवारी २०२२ रोजी एनआयएच्या एफआयआरमध्ये सलीम फ्रूटचे नाव होते, आज एनआयए मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून अंडरवर्ल्डसाठी काम करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत आहे.