मुंबई -अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या पकरणात आज(3 सप्टेंबर) एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने हे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात सचिन वाझे, सुनील माने, निलंबित पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझी अटकेत आहेत. तसेच प्रदीप शर्मालासुद्धा अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक केली असून, हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
- आतापर्यंतचा घटनाक्रम -
25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या कांड्या होत्या. याप्रकरणात सुरुवातीला एनआयएने सचिन वाझेला अटक केली होती. काही दिवसांनी ठाणे जिल्ह्यातल्या रेतीबंदर येथे मनसुख हिरेन याचा मृतदेह आढळून आला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची लिंक अँटिलिया स्फोटकं प्रकरणाशी जुळली. कारण जी गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली ती गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन हा सचिन वाझेचा मित्र होता.
- आतापर्यंतची कारवाई -