मुंबई -अँटिलिया स्कॉर्पियो स्फोटकं प्रकरण (Antilia bomb scare) आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील (Mansukh Hiren Murder Case) आरोपी नरेश गौरला (accused Naresh Gaurs bail) मुंबई उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने जामीन देऊन दिलासा दिला होता. या निर्णयाविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA file Review Petition In Naresh Gaur Bail) मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठासमोर धाव घेतली असून या प्रकरणात पुढील सुनावणी 15 डिसेंबर (Hearing on Naresh Gaur Bail Will Be on 15 December) रोजी होणार आहे. त्यामुळे नरेश गौर यांचा जामीन (Naresh Gaur Bail) मिळून सुद्धा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
एनआयएची दोन सदस्यीय खंडपीठासमोर धाव -
नरेश गौर 22 दिवस झाले तरीही अजून कारागृहातच आहे. नरेश गौरला जामीन मंजूर करून आपल्याच निर्णयाला स्थगिती देण्याचा कनिष्ट न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने रद्द केल्याच्या निर्णयाला एनआयएने दोन सदस्यीय खंडपीठासमोर धाव घेत आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या याचिकेवर 15 डिसेंबर रोजी सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.