महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरेगाव भीमा प्रकरण; आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला - Stan Swamy bail refuse

शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने फेटाळला आहे. याआधी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Stan Swamy
फादर स्टेन स्वामी

By

Published : Mar 22, 2021, 5:35 PM IST

मुंबई - एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी स्टेन स्वामींचा जामीन एनआयए कोर्टाने आज फेटाळला आहे. एनआयएने फादर स्टेन स्वामी यांच्या जामिनाला विरोध केला होता.

एनआयएने दाखल केलेल्या नव्या कागदपत्रांना उत्तर देण्यासाठी फादर स्टेन स्वामी यांच्या वकीलांना वेळ लागल्यामुळे स्टेन स्वामी यांच्या जामीन अर्जाच्या निर्णयावर 22 मार्चपर्यंत विलंब झाला होता.

हेही वाचा -शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार

कोण आहेत स्टेन स्वामी?

83 वर्षीय फादर स्टेन स्वामी हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात अनेक महिन्यापासून आहेत. आदिवासींसोबत काम करणारे कार्यकर्ते अशी फादर स्टेन यांची ओळख आहे. गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती. त्यावेळी थेट न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने त्रस्त आहेत, त्यांची श्रवण शक्ती कमी झाले आहे. तसेच लंबर स्पॉन्डिलायसिसमुळे ते त्रासलेले आहेत.

काय आहे प्रकरण?

स्टेन स्वामींनी कोणत्याही बेकायदेशीर कृतींमध्ये भाग घेतला किंवा ते अशा कामात वचनबद्ध होते किंवा त्यांनी बेकायेशीर काम करण्यास भडकवले, हे स्थापित करण्यात अभियोजन पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे या कारणांवरून आरोपी पक्षाने जामीन मागितला होता. म्हणून, बेकायदेशीर कृती प्रतिबंध अधिनियम यूएपीएच्या कलम 13 लागू करणे शक्य नाही, असे आरोपीच्या वकिलांचे मत आहे.

असा झाला युक्तिवाद -

अ‍ॅड. शरीफ शेख यांनी फादर स्टेन स्वामींच्या बाजूने युक्तिवाद केला की, कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कार्यात त्यांचा सहभाग असल्याचे सुचवण्यासाठी फिर्यादींनी कोणतेही पुरावे रेकॉर्डवर आणले नाही, म्हणून युएपीएचे कलम 16, 20 आणि 39 फादर स्टेन स्वामीच्या खटल्याला लागू होत नाही.

एनआयएची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, स्वामी हे विस्टापन विरोधी जन विकास आंदोलन आणि पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संघटनांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच स्वामींचा माकप (माओवादी) या संस्थेच्या कार्यात सहभाग असल्याचा दावा केला. फादर स्टेन स्वामींनी पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एनआयएला पुरावे परत मिळवण्यात यश आले आहे, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली आहे.

हेही वाचा -कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला

ABOUT THE AUTHOR

...view details