महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Reward on Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला एनआयएकडून मिळणार बक्षीस - Underworld don Dawood Ibrahim

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworld don Dawood Ibrahim माहिती देणाऱ्यांसाठी एनआयएकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Underworld don Dawood Ibrahim
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

By

Published : Sep 1, 2022, 10:01 AM IST

Updated : Sep 1, 2022, 10:57 AM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworlddon Dawood Ibrahim माहिती देणाऱ्यांसाठी एनआयएकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जो कोणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देईल त्याला पंचविस लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच छोटा शकीलची माहिती देणाऱ्यास वीस लाखाचं बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. तर, अनिस इब्राहिम शेख, जावेद चिकना, टायगर मेनन यांच्यासाठी प्रत्येकी 15 लाखाचे बक्षीस. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर Dawood Ibrahim अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने छापेमारी केलीय. मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये मिळून एकूण 29 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात मोठी रक्कम आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. एनआयएने एका प्रकरणात मुंबई आयुक्तालय हद्दीतील 24 ठिकाणी आणि मीरा-भाईंदर आयुक्तालय हद्दीतील 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

एनआयएने ज्या प्रकरणात छापेमारी केली ते हाजी अनीस म्हणजे अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्भ दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथिदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आलीय. तसंच दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही एनआयएने दिली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworld don Dawood Ibrahim माहिती देणाऱ्यांसाठी एनआयएकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जो कोणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देईल त्याला पंचविस लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच छोटा शकीलची माहिती देणाऱ्यास वीस लाखाचं बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. तर, अनिस इब्राहिम शेख, जावेद चिकना, टायगर मेनन यांच्यासाठी प्रत्येकी 15 लाखाचे बक्षीस. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर Dawood Ibrahim अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने छापेमारी केलीय. मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये मिळून एकूण 29 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात मोठी रक्कम आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. एनआयएने एका प्रकरणात मुंबई आयुक्तालय हद्दीतील 24 ठिकाणी आणि मीरा-भाईंदर आयुक्तालय हद्दीतील 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

एनआयएने ज्या प्रकरणात छापेमारी केली ते हाजी अनीस म्हणजे अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्भ दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथिदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आलीय. तसंच दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही एनआयएने दिली आहे.

Last Updated : Sep 1, 2022, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details