मुंबई -भारताततील मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworld don Dawood Ibrahim माहिती देणाऱ्या व्यक्तीला 25 लाखाचं बक्षीस राष्ट्रीय तपास यंत्रणा National Investigation Agency अर्थात एनआयएने NIA जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिम याच्यावर मुंबई सह अनेक देशांमध्ये आतंकवादी कारवाया स्मगलिंग यासारखे अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असून त्याला पकडण्याकरिता मदत करणाऱ्या व्यक्तीला Reward for information on Dawood Ibrahim बक्षीस जाहीर केले आहे.
माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपये -राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपये तर छोटा शकीलची Chhota Shakeel माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये देण्यात येतील. तसंच हाजी अनिस शेख, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर प्रत्येकी 15 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दाऊद इब्राहिमच्या संबंधातील सर्व गुन्हे राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे वर्ग केल्यानंतर दाऊद इब्राहिम Dawood Ibrahim विरोधात तपास यंत्रणेने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी केल्यानंतर या प्रकरणात छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमला दहशतवादी कारवाया करिता पैसे पाठवत असल्याचा आरोप सलीम फ्रुट वर एनआयएकडून करण्यात आला होता.
दहशतवादी राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान -भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदनं सध्या एक युनिट स्थापन केली असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. येत्या काळात भारतात दहशतवादी हल्ला किंवा देशातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान या युनिटकडून राबवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारतासाठी वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
मोस्ट वॉन्टेड -पाकिस्तानातील कराची येथे राहणारा आणि 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी वाँटेड असलेला इब्राहिम याच्यावर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं 25 लाख डॉलरचं बक्षीस याआधीच जाहीर केलं आहे. दाऊद भारतातील मोस्ट वॉन्टेड पुरुषांपैकी एक आहे. लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा साथीदार अब्दुल रौफ असगर हे देखील मोस्ट वॉन्टेड आहेत.
भारतातील शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी एलईटी -डी कंपनीने प्रमुख राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी गट आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था यांच्या मदतीने भारतात एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवला. व्यापारी तसेच भारतातील शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी एलईटी जेएम आणि अल-कायदाच्या दहशतवादी आणि स्लीपर सेलला पाठिंबा देण्यासाठी दाऊदचे युनिटा काम करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.
तपासाचा एक भाग म्हणून NIA ने या वर्षी मे महिन्यात 29 ठिकाणी छापे टाकले होते ज्यात हाजी अली दर्गा आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांचाही समावेश होता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी समीर हिंगोरा छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट; गुड्डू पठाण, इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचे नातेवाईक आणि कय्युम शेख, भिवंडीचा रहिवासी यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
कोण होता दाऊदचा उजवा हात? - मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन म्हणवल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिमला कोण ओळखत नाही. दाऊदच्या डी कंपनीशी संबंधित एक व्यक्ती होती, ज्याला नंतर दाऊदचा उजवा हात म्हटले जाऊ लागले आणि त्याचे नाव छोटा शकील म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी छोटा शकील हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे.