मुंबईस्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमीत्त दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेनं आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचा पुढचा टप्पा आजपासून मुंबईत सुरु होणार आहे. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे संचालक रमेशचंद्र गौर यांनी ही माहिती दिली. याअंतर्गत स्वातंत्र्यसैनिकांचं जीवनकार्य आणि बलिदानावर आधारलेली नाटकं दाखवली जात आहेत. मुंबईत दाखवली जाणारी नाटकं पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्यानं दाखवली जाणार आहेत. याविषयी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी ईटीव्हीला माहिती दिली.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेच्या नाट्य महोत्सवाचा पुढील टप्पा मंगळवारपासून मुंबईत सुरु
मुंबईत दाखवली जाणारी नाटकं पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्यानं दाखवली जाणार आहेत. आत्तापर्यंत दिल्लीमध्ये ३० नाटकांचे प्रयोग झाले, तर देशातल्या इतर शहरांमध्ये ५ प्रयोग झाले आहेत, अशी माहिती पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी ईटीव्हीला दिली.
देशातल्या इतर शहरांमध्ये ५ प्रयोग येत्या १३ ऑगस्टला मुंबईतल्या टप्प्याची सांगता झाली. त्यानंतर १४ ऑगस्टला या महोत्सवाचा समारोप झाला. जुलै महिन्यात १६ तारखेपासून या महोत्सवाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत दिल्लीमध्ये ३० नाटकांचे प्रयोग झाले, तर देशातल्या इतर शहरांमध्ये ५ प्रयोग झाले आहेत. या महोत्सवामुळे सर्व राज्यांमधल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्य आणि बलिदानाविषयी संपूर्ण समाजाला ओळख होईल. तसंच नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना रोजगार मिळतो आहे असं रमेशचंद्र गौर यांनी ईटीव्हीला सांगितलं.