महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Case अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावर सुनावणी तहकूब - Anil Deshmukh case

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांना ईडीने मागील वर्षी अटक केली होती. आता या याचिकेवर पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्यावतीने युक्तिवाद करण्यात येणार होता. मात्र, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांची तब्येत खराब असल्याने आज याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली Anil Deshmukh bail application hearing adjourned आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Aug 17, 2022, 4:06 PM IST

मुंबईमाजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात Bombay High Court ईडीच्यावतीने युक्तिवाद करण्यात येणार होता. मात्र अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांची तब्येत खराब असल्याने आज याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये financial misappropriation case अनिल देशमुख यांना ईडीने मागील वर्षी अटक केली होती Anil Deshmukh arrested by ED . आता या याचिकेवर पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे Anil Deshmukh bail application hearing adjourned.

ईडीच्या वकिलांकडून विरोध अनिल देशमुख Anil Deshmukh case यांच्या जामीन अर्जावर मागील सुनावणी दरम्यान वरिष्ठ अ‍ॅडवोकेट विक्रम चौधरी यांनी असा युक्तिवाद केला होता की, अनिल देशमुख यांचे वाढते वय आणि त्यांना असलेल्या आजारपणामुळे न्यायालयाने वैद्यकीय कारणाच्या आधारे जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती केली होती. मात्र ईडीच्या वकिलांकडून याला विरोध दर्शवण्यात आला होता.

जामीन अर्जाला विरोध देशमुखांची याचिका पीएमएलए न्यायालयाने यापूर्वी फेटाळली आहे. पीएमएलएच्या दुहेरी अटी लागू झाल्यानंतर जामिनावर सोडण्यासाठी समाधानकारक कारणे द्यावी लागतील. त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर जामीन याचिका केली आहे. तुरुंगात कैद्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा मिळत असून देशमुखांचाही त्यात समावेश आहे. मधुमेह रक्तदाब हे सामान्य आजार आहेत. ज्यावर कोठेही उपचार होऊ शकतात. त्यामुळे जर आरोपींचा आजार चिंताकाराक असेल तर वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज करणे अपेक्षित असल्याचे सांगत एएसजी अनिल सिंग यांनी जामीन अर्जाला विरोध केला.




काय आहे प्रकरणमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचाMonsoon Session 2022 सरकारकडून दडपशाहीची वागणूक अंबादास दानवेंची भाजपवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details