मुंबई -खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यानंतर, खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असून यात दुमत नसल्याचे म्हटले आहे.
खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया... हेही वाचा.... प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही बोलेन; विदर्भातील पीक नुकसानीच्या पाहणीनंतर पवारांचे आश्वासन
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत यांनी राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असून यात दुमत नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा... काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग
संजय राऊत शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती ठणठणीत असेल तरच शिवसेना आघाडीबरोबरची चर्चा जलदगतीने पुढे जाईल, असा विश्वास अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा... BREAKING: मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शिवसेनेसोबत बैठका सुरू आहेत. तिन्ही पक्षांची सकारात्मक बातचीत सुरू असल्याचे सांगितले आहे, तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये काही अदृश्य हाथ दोन्ही पक्षाला लांब करत असल्याचे म्हटले होते. याबाबत सावंत यांना विचारले असता, त्यांनी असे अदृश्य हात आम्हाला कधी दिसले नसल्याचे बोलत भाजपला टोला लगावला आहे.