वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात... - news today maharashtra
राज्यासह देशात आणि विदेशात काय घडणार, वाचा एका क्लिकवर...
न्यूज ट्यूडे
मुंबई - वाचा राज्यासह देशात आणि विदेशात काय घडणार, तेही एकाच क्लिकवर...
- दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज राज्यभर 'दूध बंद' आंदोलन...
- नावाजलेले चित्रकार गोपाळराव बळवंतराव यांचा आज स्मृतिदिन...
- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा आज जन्मदिवस...
- 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रमाचा कॅबिनेट मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार शुभारंभ...
- भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा आज वाढदिवस...
- धार्मिक दृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची आजपासून सुरूवात..
- परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी आजपासून शिथील होणार...
- रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा आज स्मृतीदिन...
- लातूर जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन अंशतः शिथील होणार...
- पुढील चोवीस तासांत विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज...