महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्टॅन स्वामींना 15 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश - कडक लॉकडाऊन

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती बिघडल्यामुळे 15 दिवसांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

स्टेन स्वामी
स्टेन स्वामी

By

Published : May 28, 2021, 6:51 PM IST

मुंबई -शुक्रवारी झालेल्या विशेष तातडीच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती बिघडल्यामुळे 15 दिवसांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

'15 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करावे'

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे, की जे जे सरकारी रुग्णालय डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, उपकरणे सुसज्ज असले तरी सध्याच्या कोविडच्या आजारामुळे आणि रुग्णांच्या गर्दीमुळे स्वामींकडे योग्य लक्ष देणे शक्य होणार नाही. म्हणूनच कोर्टाने निर्देश दिले की स्वामी यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये शक्यतो आजच बदली करण्यात यावी आणि त्यांना 15 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करावे. सुनावणीच्या वेळी सल्लामसलत करून घेतलेल्या उपचारांचा सर्व खर्च स्वामी देतील, असेही कोर्टाने नमूद केले. स्वामींचे वय लक्षात घेऊन एक परिचारका देण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले. स्वामींच्या संरक्षणासाठी हॉस्पिटल प्रशासनाला एका पोलीस हवालदाराची हजेरी लावण्याचेही आदेश दिले आहे.

'रुग्णालयात जाण्याऐवजी मी तुरूंगातच मरेन'

मागील सुनावणीत नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांनी उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल होण्यासाठी हायकोर्टासमोर नकार दिला होता. 'रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन' फादर स्टॅन स्वामी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान उद्गार काढले होते. पार्किसन्स आजाराने त्रस्त असलेले स्टॅन स्वामी यांनी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तळोजा कारागृहात असलेले स्टॅन स्वामी सध्या 84 वर्षांचे आहेत. मला कोणत्याही रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, त्यापेक्षा मला जामीन द्या, मी रांचीला जाईन अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा -...अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार, संभाजीराजेंचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details