मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यामध्ये कोणतीही भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो होतो. पण ते उघडपणे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच आमच्या भेटीच्या फक्त अफवा असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. पण जेवढ्या तुम्ही अफवा पसरवाल तेवढे अधिक आम्ही एकत्र येऊ," असेही राऊत म्हणाले.
'दोन दिवसांचे असल्याने गोंधळात वाहू देऊ नये'
तसेच, सोमवारपासून विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू होत आहे. यावरही त्यांनी भाष्य केले आहे. त्यापूर्वी अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधी पक्षाने अधिवेशन दोन दिवस पूर्णपणे चालू दिले पाहिजे. विरोधी पक्षाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी असेल तर ते कामकाज दोन दिवस व्यवस्थितपणे चालू देतील, असेही राऊत म्हणाले.