महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 760 नवे रुग्ण; 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे - corona patient recovery rate in Mumbai

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 54 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 876 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Feb 22, 2021, 8:34 PM IST

मुंबई- कोरोनाचे आज कालच्या तुलनेत कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे आज 760 नवे रुग्ण तर 21 फेब्रुवारीला 921 रुग्ण आढळले आहेत. मुंबईने रुग्ण बरे होण्याचा 3 लाखांचा टप्पा आज ओलांडला आहे.

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897 रुग्ण आढळून आले होते.

  • मुंबईत आज 760 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 19 हजार 888 वर पोहचला आहे.
  • आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 446 वर पोहचला आहे.
  • 643 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 188 वर पोहचली आहे.
  • मुंबईत सध्या 7397 सक्रिय रुग्ण आहेत.
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे.
  • रुग्ण दुप्पटीचा कालावधी 321 दिवस इतका आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 54 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 876 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 31 लाख 46 हजार 722 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा-विरोधी पक्षातील नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी- सुधीर मुनगंटीवार

हे विभाग हॉटस्पॉट-
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजाविल्या आहेत.

हेही वाचा-जळगाव जिल्ह्यात आजपासून रात्री संचारबंदी; शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा स्थितीत टाळेबंदीची भीती अनेकांना भेडसावत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details