मुंबई - महाराष्ट्रात आज २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के झाले आहे. मागील २४ तासामध्ये राज्यात २१ हजार ९०७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात 23 हजार 501 रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त - आरोग्यमंत्री राजेश टोपे बातमी
मागील २४ तासामध्ये राज्यात २१ हजार ९०७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोरोना
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख १ हजार १८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३९ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात एकूण २ लाख ९७ हजार ४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ८८ हजार १५ इतकी झाली आहे.