मुंबई - पवई महात्मा फुले नगर हद्दीत येथे बुधवारी नवजात अर्भक सापडले असून, दोन दिवसांचे असल्याचा अंदाज आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. आणि अधिक देखभालीसाठी बाळाला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेची पार्क साईड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भांडूपच्या जंगलात सापडले नवजात अर्भक - मुंबई न्यूज
पवई येथील महात्मा फुले नगर लगत असणाऱ्या झुडपात एक स्त्री जातीचं नवजात अर्भक मिळाले होते. सायंकाळच्या सुमारास येथून रहदारी करणाऱ्या एका तरुणाला ही बाब लक्षात आली. बाळाची प्रकृती उत्तम असून, पाेलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
रक्तबंबाळ अवस्थेत सापडले अर्भक
अनिकेत मगर हा तरूण पवई आयआयटी मार्केट शेजारील महात्मा फुले नगर परिसरातून भांडूपच्या दिशेने जात होता. अचानक त्याला लहान बाळ रडत असल्याचा आवाज येत होता. तेथे त्याला एका गोणीत रक्तबंभाळ अवस्थेत नवजात अर्भक दिसले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने अर्भकाला वाचवले. आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. याची माहिती मिळताच नगरासेविका जागृती पाटील घटनास्थळी येवून नवजात बाळाला भांडूपच्या सावित्रीबाई प्रसुति रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पार्क साईड पोलिस पालकांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश