मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईत कोरोनाच्या नव्या 2 हजार 211 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई कोरोना अपडेट; कोरोनाचे 2, 119 नवे रुग्ण; 46 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट
कोरोनाने मुंबईत 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत.
कोरोनाने 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत. तर आज 3 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 36 हजार 725 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 598 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 970 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 3 हजार 467 वर गेला आहे. सध्या मुंबईत 20 हजार 922 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 77 दिवस तर सरासरी दर 0.90 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 632 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 459 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 13 लाख 10 हजार 717 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.