मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच त्याच्या लक्षणांची यादी देखील वाढत आहे. आता जगभरात तीन लक्षणांची वाढ झाली आहे. यात उलटी-जुलाब, सर्दी आणि मळमळ या लक्षणांची भर पडली आहे. त्यामुळे ही लक्षणे आढळल्यास कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी तत्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सुरुवातीला सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखी असल्यास कोरोनाची बाधा झाल्याचा संशय बळावत होता. ही लक्षणे वाढल्यानंतर तपासणी होत होती. मात्र, आता हळूहळू लक्षणे बदलल्याचे समोर आले आहे. त्यानुसार वास न येणे, चव जाणे, अंगदुखी, डोकेदुखी, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा ही लक्षणे वाढली.
मोठ्यांमध्ये या प्रकारची लक्षणे समोर येत असतानाच लहान मुलांमध्ये देखील लक्षणे बदलली. जीभ लाल होणे, शरीरावर चट्टे आणि छातीत दुखणे ही नवी लक्षणे दिसू लागली, तर आता आणखी तीन लक्षणे रुग्णांमध्ये वाढू लागली आहेत. त्यामुळे आता प्रचंड सर्दी, उलटी-जुलाब आणि मळमळ असेल तर तो कोरोना असू शकतो, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
सावधान! सर्दी, उलटी, जुलाब, मळमळ होत असेल तर असू शकतो कोरोना
कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच त्याच्या लक्षणांची यादी देखील वाढत आहे. आता जगभरात तीन लक्षणांची वाढ झाली आहे. यात उलटी-जुलाब, सर्दी आणि मळमळ या लक्षणांची भर पडलीय. त्यामुळे ही लक्षणे आढळल्यास कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच त्याच्या लक्षणांची यादी देखील वाढत आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने ही लक्षणे आपल्या यादीत समाविष्ट केली आहेत. त्यामुळे ही लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घेणे गरजेचे असल्याचे डॉ. भोंडवे यांनी सांगितले. या नव्या लक्षणांमुळे नक्कीच काळजीत भर पडलीय. मात्र, घाबरून न जाता योग्य काळजी आणि खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.