महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Omicron Cases : राज्यात ७ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग, रुग्णसंख्या १७ वर - मुंबईत ओमायक्रॉनचे नवे रुग्ण

राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १० रुग्ण आढळून आले होते. आज मुंबईत ३ तर पिंपरी चिंचवडमध्ये ४ रुग्ण नव्याने (New Omicron Cases in State) आढळून आल्याने ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे.

omicron
कोरोना फाईल फोटो

By

Published : Dec 10, 2021, 9:06 PM IST

मुंबई -सध्या भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron in India) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १० रुग्ण आढळून आले होते. आज मुंबईत ३ तर पिंपरी चिंचवडमध्ये ४ रुग्ण नव्याने (New Omicron Cases in State) आढळून आल्याने ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

  • आतापार्यंत १७ प्रवासी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह -

राज्यात अति जोखमीच्या देशातून ९६७८ तर इतर देशातून ५१ हजार ७६१ असे एकूण ६१ हजार ४३९ प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील ९६७८ तर इतर देशातील १२४९ अशा एकूण १० हजार ९२७ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले २० तर इतर देशातून आलेले ५ अशा एकूण २५ प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १७ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. १ नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८९ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ४७ जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

  • नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details