महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ची प्रश्नमंजुषा मिळवून देणार शिर्डीच्या साईबाबा मंदिरातून विशेष भेट!

सोमवार पासून 'साईबाबा-श्रद्धा आणि सबुरी' ह्या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्नाचे योग्य उत्तर 8446419091 ह्या Whatsup नंबर वर पाठविणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना शिर्डी साईबाबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली अमुल्य साईमुर्तीची अलौकिक भेट आणि संपूर्ण पूजा सामुग्री थेट शिर्डीवरुन विजेत्यांच्या घरी पाठविली जाणार आहे.

साईबाबा
साईबाबा

By

Published : May 1, 2021, 9:41 PM IST

मुंबई -‘श्रद्धा आणि सबुरी’ ही साईबाबांची शिकवण आयुष्यात यश मिळवून देते. महाराष्ट्रातील खास साई भक्तांसाठी फक्त मराठी वाहिनीने ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ ही मराठी मालिका आणली. संकटकाळी शिर्डीच्या वारीची आणि साईंच्या दर्शनाची आस आता घरच्या घरी पूर्ण होत असून साई लिलेची प्रचितीदेखील अनुभवायला मिळते आहे.

या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वेगळ्या पण नैसर्गिक सादरीकरणामुळे ही मालिका मराठी माणसांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. ३ मे सोमवारपासून 'साईबाबा-श्रद्धा आणि सबुरी' ह्या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्नाचे योग्य उत्तर 8446419091 ह्या Whatsup नंबर वर पाठविणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना शिर्डी साईबाबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली अमुल्य साईमुर्तीची अलौकिक भेट आणि संपूर्ण पूजा सामुग्री थेट शिर्डीवरुन विजेत्यांच्या घरी पाठविली जाणार आहे.

‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ ही मराठी मालिका १५ मार्च २०२१पासून ‘फक्त मराठी’ वाहिनीवर प्रसारित होऊ लागली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी भव्य सेट कलादिग्दर्शक आणि निर्माते अजित दांडेकरांनी मालाड मुंबईतील ‘कलावंत’ स्टुडिओमध्ये उभा करून जणू प्रती शिर्डीच स्थापन केली. मात्र पुन्हा महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय झाल्याने पुढील सर्व भागांचे चित्रीकरण थांबवावे लागले. प्रेक्षकांचा कौल पाहून १९ एप्रिल पासून वाहिनीने पहिल्या भागापासून मालिकेचे पुनःप्रसारण सुरू केले आणि प्रेक्षकांकडून पुन्हा पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळू लागला.

‘प्रेक्षकांसोबत वाहिनीचे जुळलेले नाते असेच कायम घट्ट राहावे, याकरिता ही प्रश्न मंजूषा आम्ही आणली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे भक्तांना इच्छा असूनही प्रत्यक्ष शिर्डीला जाता येत नाही, त्यामुळे आमच्या वाहिनीकडून भाग्यवान विजेत्यांना मिळणारी ही विशेष भेट अनोखी असेल’, असे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details