महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नव्या गृहमंत्र्यांचा इशारा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या सरकारच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अजूनही काही पोलीस अधिकारी त्यांना अवैधरित्या सरकारची माहिती पुरवत असल्याची शंका आहे. त्यामुळे असे पोलीस खात्यातील अधिकारी शोधले जातील, अशा इशारा पदभार स्वीकारताना गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिला.

dilip walse patil
dilip walse patil

By

Published : Apr 6, 2021, 4:29 PM IST

Updated : Apr 6, 2021, 4:38 PM IST

मुंबई -राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारत असताना राज्याच्या पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान आपल्या समोर आल्याचं स्पष्टीकरणही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तर विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या पोलोस अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या सरकारच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अजूनही काही पोलीस अधिकारी त्यांना अवैधरित्या सरकारची माहिती पुरवत असल्याची शंका आहे. त्यामुळे असे पोलीस खात्यातील अधिकारी शोधले जातील, अशा इशारा पदभार स्वीकारताना गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिला.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलताना
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती देखील यावेळी गृहमंत्र्यांनी दिली. तसेच पोलीस दलात होणाऱ्या बदल्या आणि प्रशासकीय निर्णयात गृहमंत्री म्हणून आपला कोणताही हस्तक्षेप नसेल. तसेच राज्याला गृहमंत्री म्हणून पारदर्शक कारभार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील गृहमंत्री यांनी स्पष्ट केले. तसेच पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तर आहेच. मात्र सध्या कोरोनाचा काळ असल्या कारणाने सामान्य नागरिक कोरोनाचे नियम पाळत आहेत का नाही? याचीदेखील जबाबदारी पोलिसांवर असल्याने पोलिसांची जबाबदारी वाढली असल्याचं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं
महाविकास आघाडीमध्ये समन्वय -
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचा ताळमेळ असून राज्य सरकारमध्ये समन्वय असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच विरोधक काय आरोप करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र येणाऱ्या काळात गृहमंत्रालयाकडून पारदर्शक कारभार राज्याच्या जनतेला पाहायला मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी वर्तवला.
Last Updated : Apr 6, 2021, 4:38 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details