मुंबई - कोरोना महामारीच्या विषाणूमुळे बाधित रुग्ण वाढत आहेत. मुंबईच्या वरळीमधील झोपडपट्टी विभागात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर धारावीमधील झोपडपट्टी विभागात रुग्णांची संख्या वाढत आहे. धारावीत नव्याने ५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील रुग्णांचा आकडा ६० वर तर मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे.
धारावीत कोरोनाचे ५ नवे रुग्ण... आकडा ६०, तर मृतांचा आकडा ७ वर - कोरोना न्यूज
धारावीत नव्याने ५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील रुग्णांचा आकडा ६० वर तर मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे.
धारावीत कोरोनाचे रोज नवे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वरळी नंतर धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. धारावीत मुकुंद नगर येथे ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ३ पुरुष तर २ महिला रुग्ण आहेत. यामुळे धारावीमधील रुग्णांचा आकडा ६० वर पोहोचला असून धारावीत आतापर्यंत डॉ. बालिगा नगरमध्ये २, मुस्लीम नगर १, सोशल नगरमध्ये १, कायलन वाडीमध्ये २ तर नेहरू नगर चाळ येथे १ असे एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत अत्यंत दाटीवाटीच्या झोपड्या असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. माहीम फाटक, आंध्रा वॅली रोड, धारावी माहीम रोड, धारावी क्रॉस रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, कटारिया मार्ग, एकेजी नगर, मदिना नगर, चित्रनगरी आदी भाग बंद करण्यात आला आहे. धारावीत सध्या घराघरात जाऊन कोरोना विषाणूची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.
कुठे किती रुग्ण -
- डॉ बलिगा नगर - 5 रुग्ण ( 2 मृत्यू)
- वैभव अपार्टमेंट - 2 रुग्ण
- मुकुंद नगर - 14 रुग्ण (5 नवे रुग्ण)
- मदिना नगर -2 रुग्ण
- धनवाडा चाळ -1 रुग्ण
- मुस्लिम नगर - 7 रुग्ण (1 मृत्यू)
- सोशल नगर - 6 रुग्ण ( 1 मृत्यू )
- जनता सोसायटी - 7 रुग्ण
- कायलान वाडी - 4 रुग्ण (2 मृत्यू)
- पीएमजीपी कॉलनी -1 रुग्ण
- मुर्गन चाळ - 2 रुग्ण
- राजीव गांधी चाळ - 2 रुग्ण
- शास्त्री नगर - 4 रुग्ण
- नेहरू चाळ - 1 रुग्ण (1 मृत्यू)
- इंदिरा चाळ - 1 रुग्ण
- गुलमोहर चाळ - 1 रुग्ण