मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात आता कोविडनंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचे तब्बल १११ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अनेक रुग्ण अतिगंभीर स्वरूपाचे आजारी आहेत.
वैद्यकीय भाषेत म्युकरमायकोसिस असे म्हटल्या जाणाऱ्या या आजाराने रुग्ण आता मुंबईसह राज्यातील इतरही जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने चिंतेची बाब आहे. वेळीच निदान न झाल्यास अथवा उपचार न मिळाल्यास हा आजार बळावत जातो. यातून रुग्णाचा जबडा किंवा डोळा काढावा लागू शकतो. याचे संक्रमण मेंदुला झाल्यास प्रसंगी प्राणही गमवावा लागू शकतो.
मुंबईमध्ये रुग्णांची संख्या अधिक -
मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार सुरू असताना कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचे तब्बल १११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या केईएम, नायर आणि सायन रुग्णलयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील -
कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत या आजाराचे किती रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार कसे केले जात आहेत, तसेच त्यांच्यावर उपचारासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती देण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे केली. याबाबत माहिती देताना काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना मुंबई शहरात १११ म्युकर मायकोसिस रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी शीव रुग्णालयात ३२, केईएम रुग्णालयात ३४, नायर रुग्णालयात ३८ व कूपर रुग्णालयात ७ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरिल आहेत. हा आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही, असे काकाणी यांनी सांगितले.
तज्ज्ञ डॉक्टरांचा गट -
म्युकर मायकोसिस या आजाराबाबत कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. आजार होऊ नये, झाल्यास उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत उपचार प्रोटोकॉल निश्चित केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु केली आहे. रोग टाळण्यासाठी उपाययोजनांची खबरदारी माहिती सर्व रुग्णालयात दिली आहे. कोविड उपचार पद्धती स्टुरॉईड आणि टोकिलिझुमॅबचा अतिवापर टाळावा. विशेषतः डायबेटिक रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी. म्युकर मायकोसिस या आजारावर वापरण्यात येणाऱ्या ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शन व इतर औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरु केलेली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्युकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांना ८ ते १२ आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती काकाणी यांनी दिल्याचे प्रभाकर शिंद यांनी सांगितले.
राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील म्युकर मायकोसिसची स्थिती -