मुंबई- कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही नवीन निर्बंध राज्य सरकारकडून लावण्यात आले आहे. दहा जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही नवीन नियमावली राज्यभरात लागू होणार आहे. दहा तारखेच्या मध्यरात्रीपासून राज्यामध्ये नवीन नियमानुसार जमाव बंदी आणि संचार बंदी ( Night curfew in Maharashtra ) असणार आहे.
पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. तर तिथेच खाजगी अस्थापना आणि सलून केवळ पन्नास टक्के क्षमतेनुसार चालविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे नियम कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तरी लसीचे दोन डोस आवश्यक असल्याचे नवीन नियमावलीत सांगण्यात आले आहे.
- सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.
- रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार
- दोन डोस घेतले नसतील तर सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करता येणार नाही.
- रेस्टॉरंट आणि सिनेमागृह नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ( restrictions on hotels ) राहणार
- 2 डोस घेणाऱ्या प्रेक्षकांनाच परवानगी दिली जाणार
- रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत नाट्यगृह, रेस्टॉरंट आणि सिनेमा गृह बंद राहतील
- लग्नकार्यासाठी केवळ 50 लोकांना आमंत्रण करता ( restrictions on marriage Ceremony ) येणार
- अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना जमता येणार
खासगी आस्थापनामध्ये कोविड संदर्भातचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे.
- हॅन्ड सनिट्झर आणि मास्क वापरणे बंधनकारक असणार
- खासगी कार्यालयात मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कराव्यात
- खासगी अस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत
- खासगी आस्थापनांमध्ये वर फ्रॉम होम, केवळ 50 टक्के उपस्थिती
- राज्यातील शाळा आणि महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
- मैदान व पर्यटन स्थळ बंद राहणार
- दुकान, मॉल्स केवळ 50 टक्के क्षमतेने दहा वाजेपर्यंत सुरू राहणार
- दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांना आतमध्ये परवानगी दिली जाईल
- सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देखील केवळ पन्नास लोकांना आमंत्रण देता येणार
- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हा मध्ये प्रवास करण्यासाठी 72 तास आधी केलेली rt-pcr टेस्ट बंधनकारक असणार
- आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार प्रवेश दिला जाणार
- सरकारी कार्यालयात कोणालाही भेटता येणार नाही. आवश्यक काम असल्यास मुख्य कार्यालयाची लेखी पत्र असणे आवश्यक
- रात्री अत्यावश्यक कारणाशिवाय फिरता येणार नाही.
- दिवसा 5 किंवा त्याहून अधिक गटात फिरता येणार नाही.
- स्विमिंग पूल बंद ( Swimming pool ban in Maharashtra ) राहणार
- अशी आहे पुण्यातील कोरोनाची स्थिती
राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर, दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज 2 हजार 471 कोरोना पॉझिटिव्ह ( Pune Corona Update ) रुग्ण आढळून आले. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.