मुंबई -देशात आज 20557 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 18,517 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 1,45,654 वर सक्रिय रुग्ण आहे. आणि सकारात्मकता दर 4.13 टक्के इतका आहे.
मुंबईत मंगळवारी २८४ नवे कोरोना रुग्ण, २ मृत्यूची नोंद - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २८४ रुग्णांची तर २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २२० बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
३.९५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत गेल्या २४ तासात ७ हजार १८७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २८४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.९५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूंची नोंद झाली आहे. ४१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २१ हजार ५४६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९९ हजार ८१६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ९६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २५२४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२७ टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत -राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2093 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 5418 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1141 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 175, रायगड 417, रत्नागिरी 47, सिंधुदुर्ग 61, सातारा 214, सांगली 138, कोल्हापूर 128, सोलापूर 302, नाशिक 607, अहमदनगर 421, जळगाव 72, धुळे 97, औरंगाबाद 333, जालना 220, बीड 53, लातूर 144, नांदेड 48, उस्मानाबाद 191, अमरावती 120, अकोला 121, वाशिम 263, बुलढाणा 197, यवतमाळ 57, नागपूर 1255, वर्धा 64, भंडारा 157, गडचिरोली 29 आणि चंद्रपूरमध्ये 78 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 14789 सक्रिय रुग्ण आहेत.