मुंबई - कोरोना विषाणूची लागन झालेले ४ रुग्ण मुंबई परिसरात नव्याने आढळले. त्यातील २ रुग्ण मुंबईमधील तर २ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. यामुळे मुंबई परिसरातील रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. यामुळे मुंबई परिसरातील रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. यामधील ४ रुग्णांचा उद्याप मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाचे 4 नवे रुग्ण, रुग्णांची एकूण संख्या 62 - 4 new patient infected with corona virus
कोरोना विषाणूची लागण झालेले ४ नवे रुग्ण मुंबई परिसरात नव्याने आढळले. त्यातील २ रुग्ण मुंबईमधील तर २ रुग्ण बाहेरील असून मुंबई परिसरातील रुग्णांची संख्या ६२ झाली आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे आज दिवसभरात 430 संशयित रुग्ण विविध रूग्णालयात बाह्य रुग्ण विभागात तपासण्यात आले. त्यातील 103 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात भरती करण्यात आले. दिवसात 182 रुग्णांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आजच्या दिवसात मुंबईमध्ये 2 तर मुंबईबाहेरील 2 असे एकूण 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामधील एक रुग्ण नवी मुंबईमधील 57 वर्षाचा पुरुष आहे, दुसरा कामोठे रायगड येथील 38 वर्षाचा पुरुष असून, त्याने त्रिनीनाद येथील प्रवास केला आहे. तिसरा 27 वर्षीय पुरुष असून त्याने यूएसएमधून प्रवास केला आहे. चौथा 39 वर्षीय पुरुष असून त्याने यूएईचा प्रवास केला आहे. या चारही रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आलेल्या 417 प्रवाशांना सेव्हन हिल हॉस्पिटल, पंच तारांकित हॉटेलमध्ये होम क्वारेंटाईन करून ठेवण्यात आला आहे.
2 जानेवारीपासून आतापर्यंत 6509 संशयित रुग्णांना तपासण्यात आले असून 1407 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले. त्यापैकी मुंबईमधील 43 तर मुंबईबाहेरील 19 रुग्ण अशा एकूण 62 रुग्णांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली आहे. त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील 2 आणि मुंबईबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे.