महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई आणि पुणे विभागात तब्बल 48 हजार 781 कोरोनाबाधित; एकाच दिवशी मुंबईत 1109 रुग्णांची नोंद - new corona patient in mumbai

देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रशासनासह राज्य सरकार देखील चिंतेत आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवत असले, तरिही त्याचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही.

Corona Update
कोरोना

By

Published : Jun 2, 2020, 9:01 PM IST

मुंबई -महाराष्ट्रातील नव्हे, तर अवघ्या देशातील कोरोनाचे केंद्र मुंबई शहर बनले असून एकट्या मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या ही 40 हजारांच्या पार गेली आहे. तर मुंबई खालोखाल राज्यात पुणे विभागात कोरोनाचे जास्ती संक्रमण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत मंगळवारी 1,109 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यात कोरोनाचे 266 नवीन रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा...जाणून घ्या, चक्रीवादळाला कसे मिळाले 'निसर्ग' नाव?

मुंबईतील कोरोनाची सद्यस्थिती ;

मंगळवार (ता. 2 जुन)

मुंबईत कोरोनाचे 1,109 नव्या कोरोनाबाधीतांची नोंद, 49 रुग्णांचा मृत्यू

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 41,986 वर, तर मृतांचा आकडा 1,368 वर पोहचला

मुंबईत आतापर्यंत 17,213 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईत सध्या 23,405 सक्रिय कोरोना रुग्ण

पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती ;

मंगळवार (ता. 2 जुन)

पुणे विभागात दिवसभरात कोरोनाचे 266 नवीन रुग्ण

मंगळवारी कोरोनातून बऱ्या झालेल्या 169 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

पुण्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 25 बळी

नव्या 25 बळींसह पुण्यातील मृतांचा आकडा पोहचला 344 वर

पुण्यात सद्या एकूण 6,795 कोरोनाबाधित रुग्ण

तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,119

सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2,331 तर,

गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांची संख्या 165

हेही वाचा...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 'हे' सहा मोठे निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details