मुंबई -देशातआज 15,528 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 18,301 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 1,43,654 वर सक्रिय रुग्ण आहे.
दरम्यान, कोरोनावरील लस फार काळ त्यापासून संरक्षण करू शकत नाही असे एका अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे.
राज्यात एकूण 1,43,654 सक्रिय रुग्ण - राज्यात एकूण 1,43,654 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2232 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1208 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील कोरोना रुग्णांचा आलेख घटला - देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात मागील चार दिवस दररोज वीस हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण आज कोरोना रुग्णांचा आलेख घसरला आहे. रविवारी दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1 लाख 44 हजार 264 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासाह आतापर्यंत देशात 4 कोटी 30 लाख 97 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत सोमवारी १६७ रुग्णांची वाढ, शून्य मृत्यूची नोंद-मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज १६७ रुग्णांची नोंद झाली आहे. शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २५८ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
२.४२ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत गेल्या २४ तासात ६ हजार ८८६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६७ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात २.४२ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. २३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २१ हजार २६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९९ हजार ३९८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार २३३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २४२२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२८ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या स्थिर -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा -CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट