मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी ( Third Wave of Corona Mumbai ) लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. आज (सोमवारी) त्यात घट होऊन ९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत तेरा वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १४१५ सक्रिय रुग्ण आहेत.
- ९६ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२१ फेब्रुवारीला) ९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५५ हजार ६५७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३४ हजार ६८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४१५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३३१३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.
- ९७.८ टक्के बेड रिक्त