महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत २२५५ नवे रुग्ण, २ रुग्णांचा मृत्यू, १४ व्हेंटिलेटरवर - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत आज २२५५ रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५६९ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण ऑक्सिजनवर, ११५ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

corona file photo
corona file photo

By

Published : Jun 17, 2022, 10:05 PM IST

मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यात वाढ होऊन आज सलग तिसऱ्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २२५५ रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५६९ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण ऑक्सिजनवर, ११५ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१५.३९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२५५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १५.३९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. १९५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ९० हजार ५०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५७ हजार ६१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ३०४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७० टक्के इतका आहे.

महिला व पुरुषाचा मृत्यू -मुंबईत आज कोरोनामुळे २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला एक व्यक्ती ८६ वर्षाचा पुरुष असून त्याला हृदय रोग व उच्च रक्तदाब हे आजार होते. दुसरा रुग्ण ५७ वर्षाची महिला असून प्रतिकार शक्ती विरहित व फुफ्फुसाच्या कर्करोगाने दीर्घकालीन आजारी होती. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

१४ रुग्ण व्हेंटिलेटरवर -मुंबईत आज आढळून आलेल्या २२५५ रुग्णांपैकी २१४५ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८१८ बेड्स असून त्यापैकी ५६९ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण ऑक्सिजनवर, ११५ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details