महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी १९२ नव्या रुग्णांची नोंद, २ रुग्णाचा मृत्यू

रविवारी २८८ रुग्णांची नोंद झाली होती. आज ( सोमवारी ) त्यात घट होऊन १९२ रुग्णांची नोंद झाली आहे.आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २५१३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई कोरोना
मुंबई कोरोना

By

Published : Feb 14, 2022, 7:20 PM IST

Updated : Feb 14, 2022, 7:53 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवारी ३५६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सलग ३ दिवस ४०० च्या वर रुग्ण आढळून आले. त्यात किंचित घट होऊन शुक्रवारी ३६७ तर शनिवारी ३४९, रविवारी २८८ रुग्णांची नोंद झाली होती. आज ( सोमवारी ) त्यात घट होऊन १९२ रुग्णांची नोंद झाली आहे.आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २५१३ सक्रिय रुग्ण आहेत.

१९२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१४ फेब्रुवारीला) १९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५४ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३२ हजार १८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५१३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १६९१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे.

९७.२ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या १९२ रुग्णांपैकी १६७ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १० रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,८८९ बेडस असून त्यापैकी ९९६ बेडवर म्हणजेच २.७ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९७.३ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर त्यात आणखी घट होऊन ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६, ५ फेब्रुवारीला ६४३, ६ फेब्रुवारीला ५३६, ७ फेब्रुबारीला ३५६, ८ फेब्रुवारीला ४४७, ९ फेब्रुवारीला ४४१, १० फेब्रुवारीला ४२९, ११ फेब्रुवारीला ३६७, १२ फेब्रुवारीला ३४९, १३ फेब्रुवारीला २८८, १४ फेब्रुवारीला १९२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Mumbai Congress Protest : काँग्रेस-भाजपच्या आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका

Last Updated : Feb 14, 2022, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details