मुंबई -मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Corona Third Wave in Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवारी ३६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात सलग ३ दिवस ४०० च्यावर रुग्ण आढळून आले. त्यात किंचित घट होऊन शुक्रवारी ३६७, शनिवारी ३४९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज (रविवारी) त्यात आणखी घट होऊन २८८ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के तर २६७७ सक्रिय रुग्ण आहेत. ( Mumbai Corona Update on 13th feb 2022 )
- २८८ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज ( १३ फेब्रुवारीला ) २८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५४ हजार ०५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३१ हजार ८३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २६७७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १३९७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे.
- ९७.२ टक्के बेड रिक्त
मुंबईत आज आढळून आलेल्या २८८ रुग्णांपैकी २५३ म्हणजेच ८८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ३५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १३ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,८९९ बेडस असून त्यापैकी १०२७ बेडवर म्हणजेच २.८ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९७.२ टक्के बेड रिक्त आहेत.
- रुग्णसंख्या घटतेय