मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. झाली. ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६ रुग्णांची नोंद झाली. मात्र गेल्या २४ तासात चाचण्या कमी झाल्याने १७४५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १० हजार ०४७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
१७४५ नवे रुग्ण -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार २२७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७४५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ८८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७८ हजार ९४४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४९ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १० हजार ०४७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५६१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१२२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १७४५ रुग्णांपैकी १६४६ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४१ बेड्स असून त्यापैकी ३८९ बेडवर रुग्ण आहेत.