मुंबई -गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. मुंबईत कोरोनाचे आज (शुक्रवारी) 599 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत आज 599 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 12 हजार 902 वर पोहोचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 407 वर पोहोचला आहे. 612 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 95 हजार 344 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5296 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा-राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू, सरकारकडून नवीन नियमावली जारी
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 525 दिवस -
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 525 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 140 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 638 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 29 लाख 82 हजार 882 चाचण्या करण्यात आल्या आहेत.