मुंबई - नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कोविडमुळे निर्णय
मुंबई - नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कोविडमुळे निर्णय
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016मधील कलम 109मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरू करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. कोविडमुळे वर्ष 2021-22मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यादेश काढणार
या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016मधील कलम 109मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.