मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट व रुग्णसंख्या आटोक्यात आहे. आज सोमवारी 656 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 768 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचा (corona recovery rate in Maharashtra) दर 97.68 टक्के तर मृत्युदर (Corona patient death rate in Maharashtra) 2.12 टक्के इतका आहे. गेल्या काही दिवसांत 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे.
9,678 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 656 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले (new corona cases in Maharashtra) आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 30 हजार 531 वर पोहचला आहे. तर आज 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 747 वर पोहचला आहे. आज 768 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 76 हजार 450 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 47 लाख 57 हजार 390 ( corona cases in Maharashtra) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.24 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 96 हजार 042 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 9 हजार 678 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती (corona second wave in Maharashtra) आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा-Covid Vaccination : लहान मुलांना लस व ज्येष्ठांना बूस्टर डोससाठी केंद्राकडे मागणी - राजेश टोपे
रुग्णसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906, 20 नोव्हेंबरला 833, 21 नोव्हेंबरला 845, 22 नोव्हेंबरला 656 रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा-Amravati Violence देवेंद्र फडणवीसांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत- यशोमती ठाकूर
मृत्यू संख्येत चढ उतार -
तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18
नोव्हेंबरला 24, 19 नोव्हेंबरला 15, 20 नोव्हेंबरला 15, 21 नोव्हेंबरला 17, 22 नोव्हेंबरला 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा-'चौकीदारही...' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 174
अहमदनगर - 69
पुणे - 48
पुणे पालिका - 48
पिंपरी चिंचवड पालिका - 32