महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात कोरोनाच्या नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद; 773 रुग्णांचा मृत्यू - corona patients deaths in Maharashtra

राज्यात एकाच दिवसात 74 हजार 45 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर रुग्ण एकाच दिवसात बरे झाल्याची समाधानाची बाब आहे. असे असले तरी राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा ही चिंतेची बाब बनली आहे.

Maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Apr 23, 2021, 10:18 PM IST

मुंबई-राज्यात कोरोनानेने भीतीदायक स्थिती झाली आहे. राज्यात एकाच दिवशी 773 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर राज्यात नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात एकाच दिवसात 74 हजार 45 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर रुग्ण एकाच दिवसात बरे झाल्याची समाधानाची बाब आहे. असे असले तरी राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा ही चिंतेची बाब बनली आहे.


हेही वाचा-पुण्यात तोडल्या धर्माच्या भिंती! ४० मुस्लिमांनी केले हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार

राज्यातील कोरोनाची स्थिती-
राज्यात 74 हजार 45 रुग्ण 24 तासात कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 34 लाख 4हजार 792 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासांत 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 41 लाख 61 हजार 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 91 हजार 851 इतकी झाली आहे.

हेही वाचा-दिलासा! झायडस कॅडीलाचे विराफिन औषध 7 दिवसांत रुग्णांना करते बरे; कंपनीचा दावा


राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 7,199
ठाणे- 1,825
ठाणे मनपा- 1,196
नवी मुंबई-762
कल्याण डोंबिवली- 1,598
उल्हासनगर-177
मीराभाईंदर-553
पालघर-830
वसई विरार मनपा-1007
रायगड-1005
पनवेल मनपा-739
नाशिक-1,558
नाशिक मनपा-1857
अहमदनगर-2,664
अहमदनगर मनपा-943
धुळे- 224
जळगाव-1,158
नंदुरबार-44
पुणे- 2,930
पुणे मनपा- 4,536
पिंपरी चिंचवड- 2,397
सोलापूर- 1,334
सोलापूर मनपा-318
सातारा - 1,705
कोल्हापुर-451
कोल्हापूर मनपा-119
सांगली- 1,173
सिंधुदुर्ग-129
रत्नागिरी-549
औरंगाबाद-598
औरंगाबाद मनपा-616
जालना-887
हिंगोली-219
परभणी -768
परभणी मनपा-250
लातूर 1,015
लातूर मनपा-433
उस्मानाबाद-805
बीड -1,234
नांदेड मनपा-524
नांदेड-725
अकोला मनपा-318
अमरावती मनपा-200
अमरावती 413
यवतमाळ-1536
वाशिम - 502
नागपूर- 2,544
नागपूर मनपा-5,426
वर्धा-1023
भंडारा-1,124
गोंदिया-653
चंद्रपुर-1,184
चंद्रपूर मनपा-392
गडचिरोली-477

महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल-
विशाखापट्टणमहून या काळात लोकांना जीवनदान देणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस 8 वाजून 10 मिनिटाने नागपूरचा मुख्य रेल्वे स्थानकावर पोहचली. या एक्स्प्रेसमध्ये असलेले ७ टँकर्स पैकी 3 टँकर नागपूरात उतरविण्यात आले. विशाखापट्टणमहून निघालेले ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात आज दाखल झाली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. परिणामी तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात अडचणीत वाढ झाली आहे. यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस जीवनवाहिनी ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details