मुंबई - राज्यात आज ६,१५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७, ९५,९५९ वर पोहचला आहे. राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ४६ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६० टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८४ हजार ४६४ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-बीड रुग्णालयात दोन रुग्णांमध्ये भांडण; खाटेवरून पडून कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के-
राज्यात आज ४ हजार ८४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने म्हणजेच १७.१७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,२९,३४४ व्यक्ती घरात विलगीकरणात तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज एकूण ८४,४६४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.