मुंबई- राज्यात कोरोनाचे आज 30,795 रुग्ण बरे होऊन घरी ( corona patients recovery in Maharashtra ) परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 70,40,618 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के ( corona patient recovery rate in MH ) एवढे झाले आहे.
राज्यात 46,393 नवीन रुग्णाांचे निदान झाले ( new corona cases in Maharahstra ) आहे. राज्यात 48 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.9 टक्के ( corona patients deaths in Maharashtra ) एवढा आहे.
हेही वाचा-Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'
3,382 व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,31,74,656 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 74,66,420 (10.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह ( corona patients tests in MH ) आले आहेत. सध्या राज्यात 21,86,124 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर 3,382 व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. ओमायक्रोनचे 416 बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई 321, नागपूर 62, मुंबई मनपा 13, वर्धा 12 अमरावती 6 आणि भंडारा 1, नाशिक 1 अशी रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा-नाशिक : 200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणार; आदित्य ठाकरेंची आयुक्तांना आराखड्यात बदल करण्याची सूचना
विभागनुसार कोरोना रुग्ण आकडेवारी -
- मुंबई महापालिका - 3568
- ठाणे - 422
- ठाणे मनपा - 714
- नवी मुंबई पालिका - 1047
- कल्याण डोबिवली पालिका - 448
- मीरा भाईंदर - 201
- वसई विरार पालिका - 222
- नाशिक - 914
- नाशिक पालिका - 1457
- अहमदनगर - 821
- अहमदनगर पालिका - 466
- पुणे - 3155
- पुणे पालिका - 8316
- पिंपरी चिंचवड पालिका - 4225
- सातारा - 1466