मुंबई -राज्यात ३,८२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे नवीन कोरोनाबाधितांचा आकडा १८,६८,१७२ वर पोहचला आहे. राज्यात आज ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आजतागायत एकूण ४७,९७२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ७१,९१० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी; आरोपीच्या पत्नीला होऊ शकते अटक
राज्यात कोरोनाचे ७३,१६६ सक्रिय रुग्ण -
राज्यात आज ५,००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण १७,४७,१९९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१५,०२,४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६८,१७२ नमुने म्हणजेच १६.२४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात ५,४१,०५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ५,१३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज एकूण ७१,९१० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-मुंबईकरांनो सुधरा, अन्यथा 'नाईट कर्फ्यू' लागू शकतो
कधी किती रुग्ण आढळून आले?
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५, ४०० रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते.
- १९ ऑक्टोबर- ५९८४ रुग्ण
- २६ ऑक्टोबर - ३६४५ रुग्ण
- ७ नोव्हेंबर- ३,९५९ रुग्ण
- १० नोव्हेंबर- ३,७९१ रुग्ण
- १५ नोव्हेंबर- २,५४४ रुग्ण
- १६ नोव्हेंबर- २,५३५ रुग्ण
- १७ नोव्हेंबर- २,८४० रुग्ण
- २० नोव्हेंबर- ५,६४० रुग्ण
- २१ नोव्हेंबर - ५७६० रुग्ण