महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचे आढळले नवीन 2,736 आढळले रुग्ण; 46 रुग्णांचा मृत्यू - Maharashtra corona update news

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 36 हजार 2 वर पोहचला आहे. तर आज 46 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 215 वर पोहोचला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Feb 4, 2021, 8:26 PM IST

मुंबई -राज्यात 2,736 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.71 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.52 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 36 हजार 2 वर पोहचला आहे. तर आज 46 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 215 वर पोहोचला आहे.

आज कोरोनातून 5,339 रुग्ण बरे -
राज्यात आज 5,339 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 48 हजार 674 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 48 लाख 21 हजार 561 नमुन्यांपैकी 20 लाख 36 हजार 002 नमुने म्हणजेच 13.74 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 78 हजार 676 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 34 हजार 862 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा-एलआयसीचा आयपीओ दिवाळीत खुला होणार

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा-आरबीआयचा दणका; सेवा विकास सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड

मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू
कोरोना लसीकरण मोहीम मुंबईत वेगात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 80 टक्के कोरोना योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तेव्हा आजपासून दुसऱ्या टप्प्याची ट्रायल सुरू झाली असून, परवापासून खऱ्या अर्थाने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात होईल. या टप्प्यात 1 लाख 80 हजार फ्रंटलाईन योद्ध्यांना लस दिली जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details