मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third wave of corona virus ) आली. मात्र, आता ती आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५०च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात काही दिवस वाढ झाली होती. आज पुन्हा घट होऊन २६ रुग्णांची नोंद झाली. तर शून्य मृत्यूची नोंद (Corona Patient Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ३१३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
आज २६ नवे रुग्ण -मुंबईत आज सोमवारी २६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार ४४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ५६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७१०१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या २६ रुग्णांपैकी २६ म्हणजेच १०० टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार १५१ बेड्स असून त्यापैकी १८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.