मुंबई -कोरोनाची तिसर्या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दुसर्या लाटेदरम्यान ऑक्सिजन बेडची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास आणि गोरेगाव येथील ‘नेस्को’ जम्बो कोविड सेंटर- २ मध्ये प्रत्येकी एक हजार ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. तसेच पोदारमध्ये ३० आयसीयू घेतले जाणार आहेत.
ऑक्सिजन बेड वाढणार -
कोरोनाच्या दुसर्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या दहा हजारांवर गेली असताना दररोज ऑक्सिजन बेडची आवश्यकता असणारे रुग्णही वाढले होते. मात्र पालिकेने आपली सर्व यंत्रणा सक्षम ठेवल्याने मुंबईत कोणतीही दुर्घटना घडली नाही. पालिकेच्या उपाययोजनांमुळे १६८ रुग्णांना सुरक्षितरीत्या हलवल्याने मोठा अनर्थ टळला होता. असे असले तरी तिसर्या लाटेत दुसर्या लाटेपेक्षा जास्त वेगाने रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून तैनात ठेवण्यात येत आहे. भायखळ्याच्या रिचर्डसन क्रुडास कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सुरू करण्याची मागणी करण्यात आल्यामुळे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर ४ कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
‘नेस्को-२’मध्ये फॅमिली वॉर्ड -