मुंबई :मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ९१९१ सक्रिय रुग्ण (Active Corona Patients) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
१९६५ नवे कोरोना रुग्ण :मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासांत १५ हजार ३४६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ७६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७७ हजार १९९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४८ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१०७ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १९५६ रुग्णांपैकी १८७३ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४३ बेड्स असून, त्यापैकी ३६९ बेडवर रुग्ण आहेत.