महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARASHTRA CORONA UPDATE - रुग्णसंख्येत किंचित वाढ; राज्यात 1825 नवे रुग्ण

कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 96 हजार 645 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 886 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 27 हजार 426 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Oct 20, 2021, 9:40 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. बुधवारी 20 ऑक्टोबरला रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन 1825 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 2 हजार 897 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1,736, 16 ऑक्टोबरला 1,553, 17 ऑक्टोबरला 1,715, 18 ऑक्टोबरला 1,485, 19 ऑक्टोबरला 1,638 रुग्णांची नोंद झाली. बुधवारी 20 ऑक्टोबरला त्यात किंचित वाढ होऊन 1, 825 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

हेही वाचा-दबावाला न जुमानता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा- मुख्यमंत्र्यांचे पालिका प्रशासनाला निर्देश


25,728 सक्रिय रुग्ण -
कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 96 हजार 645 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 886 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 27 हजार 426 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 13 लाख 70 हजार 390 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.75 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 5 हजार 205 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 25 हजार 728 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा-दिलासादायक : पुण्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही!


रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 29 सप्टेंबरला 3,187, 30 सप्टेंबरला 3,063, 1 ऑक्टोबरला 3,105, 4 ऑक्टोबरला 2,026, 11 ऑक्टोबरला 1,736 व 14 ऑक्टोबरला 2,384 मृत्यूंची नोंद झाली आहे. 15 ऑक्टोबरला 2,149, 16 ऑक्टोबरला 1,553, 17 ऑक्टोबरला 1,715, 18 ऑक्टोबरला 1,485, 19 ऑक्टोबरला 1,638 व 20 ऑक्टोबरला 1,825 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49 व 20 ऑक्टोबरला 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

हेही वाचा-Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 462
अहमदनगर - 188
पुणे - 191
पुणे पालिका - 116
पिंपरी चिंचवड पालिका - 91

पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !

कोरोना महामारीमध्ये कधीकाळी पुणे हे हॉटस्पॉट ठरले होते. आता देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पुण्यातही कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. विशेष म्हणजे, आज (20 ऑक्टोबर) पुण्यात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details