मुंबई -महानगरात मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 1791 रुग्णांची नोंद झाली लअसून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 2988 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई कोरोना अपडेट : कोरोनाचे 1791 नवे रुग्ण; 47 रुग्णांचा मृत्यू, 2988 रुग्णांची कोरोनावर मात - mumbai 47 coronery died news
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस तर सरासरी दर 0.81 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 638 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 511 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 13 लाख 40 हजार 767 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 1791 नवे रुग्ण आढळून आले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 38 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 29 पुरुष तर 18 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 40 हजार 339 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 682 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 2988 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 08 हजार 099 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 717 सक्रिय रुग्ण आहेत.