महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत वाढ, १६४२० नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू - मुंबई कोरोना रुग्ण मृत्यूदर

मुंबईत आज (१२ जानेवारीला) १६४, २० नवे रुग्ण आढळून आले ( New corona cases in Mumbai ) आहेत. तर ७ मृत्यूची नोंद झाली ( Corona patients deaths in Mumbai ) आहे. आज १४,६४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( corona patients discharge after cure ) आला आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Jan 12, 2022, 8:35 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २, ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत आज (१२ जानेवारीला) १६,४२० नवे रुग्ण आढळून ( 16420 corona cases in Mumbai ) आले आहेत. तर ७ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १४,६४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन काल ११ जानेवारीला ११६४७ रुग्णांची नोंद झाली. आज १२ जानेवारीला त्यात पुन्हा वाढ दिसून आली आहे.

(Mumbai Corona Update on 12th Jan 2022 ) १६४२० नव्या रुग्णांची नोंद-
आतापर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार २८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख ३४ हजार ९६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २ हजार २८२ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५६ इमारती सील आहेत. ५ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.८५ टक्के इतका आहे.

८० टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या १६४२० रुग्णांपैकी १३७९३ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ९१६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ९८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,८११ बेडस असून त्यापैकी ६९४६ बेडवर म्हणजेच १८.८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८१.२ टक्के बेड रिक्त आहेत.


हेही वाचा-FIR Against Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज वर्धा पोलिसांच्या ताब्यात; दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून ( corona cases in Mumbai ) आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०८६०, ५ जानेवारीला १५,१६६, ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा-Mayor Kishori Pednekar : लस न घेणाऱ्यांचे ८४ टक्के मृत्यू! लस घेऊन सुरक्षित व्हा -किशोरी पेडणेकर

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा-Home Minister Orders Inquiry : पोलीसांच्या बदल्यांची यादी फुटली कशी? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

धारावीत ६९ रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७, ९ जानेवारीला १२३, १० जानेवारीला ९७, ११ जानेवारीला ५१, १२ जानेवारीला ६९ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८२६३ रुग्ण असून ७१०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ७५६ सक्रिय रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details