मुंबई- महानगरात मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली होती. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली. आज मंगळवारी मुंबईत कोरोनाच्या 1585 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाच्या नव्या 1585 रुग्णांची नोंद, 49 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवस तर सरासरी दर 1.28 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 592 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत.
मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 1585 नवे रुग्ण आढळून आले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 36 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 73 हजार 534 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 227 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1717 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 34 हजार 066 वर गेला आहे. सध्या मुंबईत 30 हजार 879 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवस तर सरासरी दर 1.28 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 592 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 763 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 36 हजार 574 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.